वरकुटे मलवडी, (प्रतिनिधी) – माण तालुक्यातील माजी सभापती विजय बनसोडे यांची सातारा जिल्हा अनुसूचित जाती मधून जिल्हा काँग्रेस उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. माण तालुका वरकुटे मलवडी काँग्रेस पक्षाचे राज्यभर काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी काँग्रेस नेते अहोरात्र मेहनत घेत आहेत.
त्यासाठी राज्यभर पक्षाच्या निवडी होत आहेत. त्यातच सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले महाराष्ट्र राज्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले साहेब यांच्या हस्ते जिल्ह्यातील निवडी करण्यात आल्या. यामध्ये विजय बनसोडे यांची सातारा जिल्हा अनुसूचित जातीमधून जिल्हा काँग्रेस उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
यावेळी सातारा जिल्हा अनुसूचित जाती काँग्रेसचे अध्यक्ष संजय तिडके, सातारा जिल्हा काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष डॉ.सुरेश जाधव, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित आप्पा चिखलीकर,किसान काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष कृषिरत्न प्रा. विश्वभर बाबर, म्हसवड शहर काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक विकास गोंजारी, जिल्हा सरचिटणीस विष्णुपंत अवघडे, नरेश देसाई तसेच काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.