खंडाळा, (प्रतिनिधी) – शिरवळ याठिकाणी पुणे थांब्याजवळ दुचाकीने दिलेल्या धडकेतहोमगार्ड परबती धर्मु बाबर (वय५०, रा. शेंदुरजणे ता. वाई, सध्या रा. सुरूर ता. वाई) हे होमगार्ड गंभीर जखमी झाले.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, परबती बाबर हे होमगार्ड म्हणून वाई पथकामध्ये कार्यरत आहेत. परबती बाबर यांना शिरवळ पोलीस स्टेशन याठिकाणी कर्तव्य असल्याने ते पुणे थांबा येथून कर्तव्यावर चालत जात असताना दुचाकी (क्रं. एमएच-११-सी. झेड.०५४५) वरील संकेत साळेकर याने जोरदार धडक दिली. यामधे परबती बाबर हे गंभीर जखमी झाले.
यावेळी शिरवळ पोलीस व शिरवळ रेस्क्यू टिमच्या सहकार्याने जखमीला शिरवळ ग्रामपंचायतीच्या रुग्णवाहिकेतून खाजगी रुग्णालयात दाखल केले. गंभीर जखमी असल्याने अधिक उपचारासाठी पुणे येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची फिर्याद गणेश बाबर यांनी दिली असून दुचाकीचालक संकेत साळेकर याच्याविरुद्ध गुन्हा दखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस अंमलदार सुनील मोहरे हे करत आहेत.