Eknath Shinde-led Shiv Sena moves Bombay HC against Maharashtra Speaker : आम्हीच खरी शिवसेना आहोत, त्यामुळे आमचा व्हिप न मानणाऱ्या ठाकरे गटाच्या त्या 14 आमदाराचे निलंबन का करण्यात आले नाही, असा सवाल करत शिवसेना शिंदे गटाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निकालाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
शिवसेना शिंदे गटाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांच्याकडून विधानसभा अध्यक्षांच्या निकालाला आव्हान देण्यात आले आहे. शिंदे गट हाच खरी शिवसेना असल्याचे सिद्ध होते, तर भरत गोगावले यांचा व्हीप न मानणाऱ्या ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र का केले नाही? असा प्रश्न या याचिकेतून करण्यात आला आहे.
Eknath Shinde-led Shiv Sena moves Bombay HC against Maharashtra Speaker decision to not disqualify Uddhav Thackeray faction MLAs
— Press Trust of India (@PTI_News) January 15, 2024
आम्हीच खरी शिवसेना असल्याने ठाकरे गटाच्या त्या 14 आमदारांना निलंबित करण्याची याचिकेतून मागणी करण्यात आली आहे. शिंदे गटाच्या या याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.