Rohini Khadse| लोकसभा निवडणुकीचे वारे सध्या सर्वत्र वाहत आहे. यादरम्यान अनेक नेते पक्षांतर करत आहेत. यातच मागील काही दिवसांपासून एकनाथ खडसे पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली होती. अखेर एकनाथ खडसे यांनी शरद पवार यांची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र एकनाथ खडसे यांच्या मुलगी रोहिणी खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर आता रोहिणी खडसे यांनी आपल्या सोशल मीडिया पेजवरुन एकनाथ खडसे यांचा फोटो हटवला आहे.
एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता रोहिणी खडसे काय करणार याची उत्सुकता सर्वांना होती. परंतु रोहिणी खडसे यांनी स्वतः स्पष्टीकरण देत आपण शरद पवारांच्या सोबतच राहणार असल्याचं सांगितलं आहे. एकनाथ खडसे हे भाजपमध्ये जात असले तरी त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी राष्ट्रवादीतच राहणं पसंत केले आहे.
काही दिवसांपूर्वीच रोहिणी खडसे यांनी “मी राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची प्रदेशाध्यक्षा म्हणून काम करीत आहे, मी याच पक्षात आहे व भविष्यातही याच पक्षात राहणार आहे. मी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांसोबतच …लढ़ेंगे और जीतेंगे”, असे ट्विट करत आपली भूमिका स्पष्ट केली होती. Rohini Khadse|
दरम्यान, एकनाथ खडसे यांच्या सून रक्षा खडसे या भाजपच्या खासदार असून रावेरमधून त्यांना पुन्हा एकदा पक्षाने उमेदवारी दिली आहे. आता खडसे हे पुन्हा भाजपसोबत येत असल्याने उत्तर महाराष्ट्रात भाजपची ताकद वाढण्याची शक्यता आहे.
शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर Rohini Khadse|
काही वेळापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या 10 जागा मधील 2 जागांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. एकनाथ खडसे भाजपमध्ये जात असल्यामुळे रावेर लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार कोण असणार? यावर गेल्या काही दिवसांपासून चर्चा होत होती. अखेर आज शरद पवार गटाकडून साताऱ्यातून शशिकांत शिंदेंना आणि रावेरमधून श्रीराम पाटील यांना तिकीट देण्यात आले. मात्र, माढा लोकसभा मतदारसंघाचा तिढा मात्र अद्याप कायम आहे.
हेही वाचा:
नाना पटोलेंच्या गाडीचा भीषण अपघात; गाडीचा चक्काचूर, काँग्रेसचा भाजपावर गंभीर आरोप…