Janhvi Kapoor । चित्रपटांव्यतिरिक्त बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा नातू उद्योगपती शिखर पहाडियाला डेट करत असल्याच्या बातम्या गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत आहे.
View this post on Instagram
असे असले तरी अद्याप या दोघांनी त्यांच्या नात्याची उघडपणे पुष्टी केली नाही. मात्र पुन्हा एकदा जान्हवी कपूरने वडील बोनी कपूर यांच्या प्रोडक्शन हाऊस हजेरी लावली. यावेळी तिच्या नेकलेसने सर्वांचे लक्ष वेधून घेतले, या नेकलेवर ‘शिखू’ नाव कोरलेले आहे. हे पाहून चाहत्यांनी दावा केला की त्यांनी त्यांच्या नात्याची पुष्टी केली आहे.
27 वर्षीय जान्हवी कपूर गेल्या वर्षी करण जोहरच्या प्रसिद्ध चॅट शो ‘कॉफी विथ करण’मध्ये दिसली होती. करणने मोबाईलच्या स्पीड डायलमध्ये कोणता नंबर सेव्ह केला आहे असं विचारल्यावर जान्हवीच्या तोंडातून ‘शिखू…’ असा उच्चार बाहेर पडला. जान्हवी कपूरच्या रिलेशनबाबत वडील बोनी यांनी सुद्धा होकार दिला होता. शिखर पहारियाचे त्यांनी कौतुक केले होते.
हे वाचलं का ? तापसी पन्नूने लग्नाच्या बातमीला दिला ‘दुजोरा’