पिंपरी -राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे येत्या गुरुवारी (3 फेब्रुवारी) पिंपरी-चिंचवड शहरात येणार आहेत. महाराष्ट्राचे गोल्डमॅन व राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश चिटणीस प्रशांत सपकाळ यांच्या सांगवी येथील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन खडसे यांच्या हस्ते होणार आहे.
उद्घाटनासोबतच कार्यकर्त्यांचा मेळावा होणार असून या माध्यमातून खडसे राष्ट्रवादीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते, उद्योजक, व्यावसायिक व स्थानिक रहिवाशांना मार्गदर्शन करणार आहेत. राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश चिटणीस प्रशांत सपकाळ म्हणाले की, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे यांच्या कार्यापासून प्रेरणा घेत राष्ट्रवादी युवकचे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख व कार्याध्यक्ष रविकांत वरपे यांच्या मार्गदर्शनाने जनसेवेसाठी सांगवीमध्ये जनसंपर्क कार्यालय सुरू करत आहोत.
सांगवी परिसरामध्ये लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी व सर्वसामान्य जनतेला आपले प्रश्न मांडण्यासाठी हक्काचे व्यासपीठ या जनसंपर्क कार्यालयाद्वारे उपलब्ध होणार आहे. जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाकरिता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे विद्यमान पदाधिकारी, आजी व माजी नगरसेवक, सर्व सेलचे पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे, असे आवाहनही सपकाळ यांनी केले आहे.