पिंपरी, दि. 7 (प्रतिनिधी) -भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर देशभर अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून “हर घर तिरंगा’ उपक्रमासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आलेले ध्वज हे चुकीच्या पद्धतीने तयार करण्यात आले तर त्यावरील प्रिंटींगही चुकल्याने खळबळ उडाली आहे. त्यातच अनेक ध्वज चुरगळलेले, साईजमधील नसल्याने महापालिकेच्या गलथान कारभाराबद्दल नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
पालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयातून नागरिकांना राष्ट्रध्वजाची विक्री करत आहे. एका राष्ट्रध्वजाची किंमत 24 रुपये आहे. परंतु, महापालिकेकडून विक्री केलेले बहुतांश राष्ट्रध्वज चुकीच्या पद्धतीने प्रिंट झाले आहेत. नियमानुसार अशोक चक्र हे राष्ट्रध्वजाच्या मध्यभागी असले पाहिजे. पण, विक्री झालेल्या अनेक राष्ट्रध्वजावर अशोकचक्र मध्यभागी दिसत नाही.
. ज्या नागरिकांना चुरगळलेले, नियमानुसार प्रिंट नसलेले राष्ट्रध्वज मिळाले असतील तर त्यांनी राष्ट्रध्वज महापालिकेकडे परत करावेत. त्यांना नवीन राष्ट्रध्वज देण्यात येतील. – मनोज लोणकर, उपायुक्त, भांडार विभाग