केंद्रीय कर्मचाऱ्यांना तीनपेक्षा अधिक मुले असण्यावर बंदी
नवी दिल्ली, दि. 4 – केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना तीनपेक्षा अधिक मुले असता कामा नयेत अशी तरतूद करणारा नियम जारी करण्यात आला आहे. 30 सप्टेंबर 1977 या तारखेपर्यंत ज्यांना तीनहून अधिक मुले असतील, त्यांना तोपर्यंत हा नियम लागू होणार नाही.
त्या तारखेनंतर मात्र त्यांना एकही मूल होता कामा नये, असे नियमात म्हटले आहे. सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांनाही असा नियम लागू करण्याच्या सूचना दिल्याचे समजते.
मंगळावर वाळू आणि खडक आढळले
पासाडेना – व्हायकिंग 2 यान आज यशस्वीरीत्या मंगळावर उतरले. यान व पृथ्वीवरील नियंत्रक तळाचे दळणवळण तुटल्याने यानाच्या मंगळावरील ऐतिहासिक अवतरणाचे फोटो अथवा माहिती आली नाही. मात्र उत्तर ध्रुवानजिक वाळूने आच्छादित असलेल्या खोलगट भागात ते उतरले.
व्हायकिंग 2 यानाने पाठविलेल्या पहिल्या दोन छायाचित्रांत वालुकामय प्रदेश व विविध प्रकारचे खडक दिसत आहेत.
नवी दिल्लीच्या आयआयटीतील माजी विद्यार्थी व इतर दोघा भारतीयांनी व्हायकिंग मोहिमेत महत्त्वाचे काम केले.