पाटणा – अंमलबजावणी संचालनालयाने बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आणि त्यांचे वडील लालू प्रसाद यादव यांना रेल्वेत नोकरीच्या बदल्यात झालेल्या घोटाळ्यात मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी आज समन्स जारी केले आहेत. त्यांना २७ डिसेंबर रोजी जबाब नोंदविण्यासाठी हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) तेजस्वी यादव यांची ११ एप्रिल रोजी सुमारे आठ तास चौकशी केली होती. लालू यादव हे केंद्रीय मंत्री असताना या घोटाळ्यात अडकले होते. हा घोटाळा 2004 ते 2009 दरम्यान घडला आला होता.
मध्ये अनेक लोकांना रेल्वेच्या विविध झोनमध्ये ग्रुप-डी पदांवर नोकऱ्या देण्यात आल्या होत्या. या बदल्यात या लोकांनी आपली जमीन तत्कालीन रेल्वेमंत्री लालू यादव यांच्या कुटुंबीयांना आणि संबंधित कंपनी एके इन्फोसिस्टमला दिली होती.
दरम्यान, राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव, माजी मुख्यमंत्री राबडी देवी आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यासह १७ जणांना नोकरीसाठी जमीन घोटाळा प्रकरणात आरोपी करण्यात आले आहे. लोकांकडून घेतलेली जमीन राबडी देवी आणि मिसा भारती यांच्या नावावरही घेतल्याचे आरोपात म्हटले आहे.