नवी दिल्ली – दिल्ली सरकारच्या उत्पादन शुल्क धोरणातील कथित घोटाळा प्रकरणात ईडीने विजय नायर आणि अभिषेक बोईनपल्ली या दोन व्यावसायिकांना अटक केली आहे. सीबीआयच्या म्हणण्यानुसार हैदराबादस्थित बोईनपल्ली हा दक्षिण भारतातील काही मद्य व्यावसायिकांसाठी लॉबिंग करत होता.
नायर, एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीचा माजी सीईओ असून तो आम आदमी पार्टीशी संबंधित आहे. त्यांनी इतरांसोबत गुन्हेगारी कट रचला होता असा ईडीचा दावा आहे.
ईडीने या प्रकरणात यापूर्वी लिकर कंपनी इंडोस्पिरीटचे प्रवर्तक समीर महांद्रू, मद्य कंपनीचे महाव्यवस्थापक पेर्नोड रिकार्ड, बेनॉय बाबू आणि अरबिंदो फार्माचे पूर्णवेळ संचालक पी. सरथचंद्र रेड्डी यांनाही अटक केली आहे. एजन्सीने या प्रकरणात आतापर्यंत तब्बल 169 ठिकाणी छापेमारी केली आहे.