तुमच्या अपेक्षांचा भंग होऊ देणार नाही : खा. उदयनराजे

संग्रहित छायाचित्र

कोणत्याही निवडणुकांना सामोरे जाताना मी कधीच वैयक्तिक टीका केली नाही. विकास करताना मी नेहमीच धोरणं घेऊन सर्वसामान्य जनतेच्या समोर गेलो आहे. तुम्ही मला पुन्हा एकदा खासदार म्हणून कामाची संधी दिलीत, त्यासाठी मी तुमचा मनापासून आभारी आहे. या विजयात समस्त सातारकरांचा व समाजातील विविध घटकांचा हात आहे. माझ्याकडून काही चुकत असेल तर मला नक्की सांगा कारण मी काही सुपरमॅन नाही.

तुमच्या कामाबाबतच्या ज्या काही इच्छा आकांक्षा असतील त्याची चर्चा करू, त्या नक्की अंमलात आणल्या जातील. राजकारणाचा श्रीगणेशा करताना मी साताऱ्याचा तरूण खासदार ठरु शकलो असतो, पण सामान्य माणूस हा माझ्या कामाचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे मी माझ्या राजकारणाची सुरुवात अगदी तळातून केली. सातारा विधानसभा मतदारसंघात मला आमदार होणे शक्‍य होते. मात्र आजी पुण्यशील राजमाता स्व. सुमित्रा राजे भोसले यांच्या आज्ञेवरून मी थांबलो.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

व्यक्ती देषी राजकारण मी कधीच करत नाही मी आजपर्यंत केवळ समाजकारण करत आलो आहे. त्यामुळे इथून पुढे विकास कामे करताना मी तुमचा कधीच अपेक्षाभंग होऊ देणार नाही. सातारा जिल्ह्यात प्रचंड दुष्काळ असून पाणीटंचाई तीव्र आहे. त्यामुळे साताऱ्यात कोणी रॅली काढू नये व विजयाचे मी कोणतेही हार तुरे स्वीकारणार नाही. याउलट टंचाईग्रस्त भागात दुष्काळ निवारण कसे होईल यासाठी लक्ष देण्याची गरज आहे. साताऱ्यातील पत्रकार, सामाजिक व्यापारी संघटना या सगळ्यांचे माझ्यावर प्रेम आहे. या प्रेमामुळेच माझे आयुष्य वर्धिष्णु आहे. तुमच्या प्रेमाचा हा झरा असाच अखंड वहात राहू दे. निकालाची अचूक आकडेवारी हातात आली नाही. काय घडले? कसे घडले? यांचा विचार मी आत्ताच करणार नाही. जे बोलायचे ते संपूर्ण तपशील हातात आल्यावर बोलेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)