दिवाळी, लोहरी नव्हेतर ‘प्रदूषण’ दिल्लीचा मुख्य उत्सव; निबंध व्हायरल 

नवी दिल्ली – दिल्लीच्या शेजारच्या राज्यांत शेकोटीने झालेला धूर दिल्ली व त्याच्या उपनगरामध्ये पसरत आहे. त्यामुळे प्रदुषणाची अगोदरच गंभीर असलेली स्थिती आता आपत्कालिन अवस्थेपर्यंत पोहोचणार आहे. अशातच प्रदूषणावर लिहलेला एक निबंध सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाली आहे. यामध्ये एका विद्यार्थ्याने प्रदूषणावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहे. विद्यार्थ्याने निबंधात प्रदूषण दिल्लीचा प्रमुख उत्सव सांगितला आहे. यासाठी अनेक कारणेही त्याने आपल्या निबंधात सांगितली आहेत.

काय आहे निबंध?
प्रदूषण दिल्लीचा प्रमुख उत्सव आहे. हा उत्सव नेहमी दिवाळीनंतर सुरु होतो. यावेळी आम्हाला दिवाळीपेक्षाही जास्त सुट्ट्या भेटतात. दिवाळीत आम्हाला चार सुट्ट्या मिळतात. पण, प्रदूषणामध्ये आम्हाला ६+२ असा ८ सुट्ट्या मिळतात. या उत्सवादरम्यान लोक वेगवेगळी मास्क घालून फिरतात. घरामध्ये काळी मिरची, मध आणि आले याचा जास्त उपयोग केला जातो.

दरम्यान, अलिकडेच राष्ट्रीय राजधानीच्या परिसरामधील हवेतील प्रदूषणाची पातळी “अतिशय घातक’ स्तरापर्यंत घसरली आहे. या घातक प्रदुषणाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होण्याची शक्‍यताही निर्माण झाली आहे. त्यामुळे सार्वजनिक आरोग्यासाठी आणीबाणीची घोषणा दिल्ली आणि राजधानीच्या परिसरात करण्यात आली आहे. मंगळवारपर्यंत शाळांनाही सुट्टी देण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.