चंद्रशेखर शेटे यांचा चार मतांनी पराभव : नाट्यावर अखेर पडदा
राजगुरूनगर – पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ तथा कात्रज दूध डेअरीच्या पंचवार्षिक निवडणुकीत खेड तालुक्यातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अरुण चांभारे व लता गोपाळे बहुमताने निवडून आले. माजी सदस्य अरुण चांभारे यांनी पुन्हा एकदा संघावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. या अटीतटीच्या निवडणुकीत अरुण चांभारे यांनी 55 मते घेत चंद्रशेखर शेटे यांच्यावर 4 मतांनी विजय मिळवला.
पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ तथा कात्रज दूध डेअरीच्या पंचवार्षिक निवडणुकीत खेड तालुक्यातून संघाचे माजी संचालक अरुण चांभारे व चंद्रशेखर शेटे यांच्यातील चुरशीची आणि अस्तित्वाची ही निवडणूक होती. उमेदवार शेटे व चांभारे यांनी त्यांच्या मर्जीतील मतदारांना राजकीय सहलीवर नेले होते.
गेश्रूरर काही दिवसांपासून तालुक्यतात दूध संघाच्या निवडणुकीचे नाट्य सुरु होते अखेर यावर निवडणूक निकालानंतर पडदा पडला. गेली वर्षांपासून अरुण चांभारे यांनी तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्याचे काम केले त्यामुळे मतदारांनी त्यांना कौल दिला.
दूध संघावर निवडनू आल्याबद्दल खेड तालुक्यात फटाके फोडून गुलाल, भांडाऱ्याची उधळण करीत जल्लोष साजरा करण्यात आला. खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मला पानसरे यांच्यासह तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी अरुण चांभारे, लता गोपाळे यांचे अभिनंदन केले.