नवी दिल्ली – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सोमवारी १९ मुलांना राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी पुरस्कार विजेत्यांशी संवाद साधणार आहेत. पुरस्कार विजेत्यांमध्ये नऊ मुले आणि १० मुलींचा समावेश आहे. ही मुले १८ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील आहेत.
प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार, 2024 विजेत्यांमध्ये कला आणि संस्कृती क्षेत्रात (७), शौर्य (१), नवकल्पना १), विज्ञान आणि तंत्रज्ञान १), समाजसेवा (४) आणि क्रीडा (५) अशा सहा श्रेणींमध्ये दिला जाईल. महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी, राज्यमंत्री डॉ. मुंजपारा महेंद्रभाई यांच्या उपस्थितीत पंतप्रधान मुलांशी संवाद साधतील.
प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार, हा एक सरकारी उपक्रम आहे, ज्याचा उद्देश ५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांच्या अपवादात्मक कामगिरीचे कौतुक करणे आणि त्यांना प्रोत्साहित करणे हा आहे. या वर्षी, पुरस्कारासाठी मंत्रालयाने प्रादेशिक आणि राष्ट्रीय वृत्तपत्रांमध्ये जाहिराती देऊन नामांकन वाढवण्यासाठी विशेष उपाययोजना केल्या, असे सरकारी निवेदनात म्हटले आहे.
निवड प्रक्रियेची पारदर्शकता निश्चित करण्यासाठी, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला गेला आहे. पात्र उमेदवारांची शिफारस करण्यासाठी नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्स चाही सल्ला घेण्यात आला. सामाजिक सेवा, पर्यावरण, विज्ञान, तंत्रज्ञान, कला आणि संस्कृती आणि क्रीडा यासारख्या विविध क्षेत्रातील तज्ञांचा समावेश असलेल्या स्क्रीनिंग समितीने शॉर्टलिस्ट केलेल्या प्रोफाइलचे परीक्षण केले,