नगर -करोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस मित्र संघटना व वंदे मातरम युवा प्रतिष्ठानच्या वतीने जिल्हा मध्यवर्ती कारागृह येथील पोलीस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढविणारे होमियोपैथीच्या आर्सेनिक अल्बम 30 या औषधांचे वाटप करण्यात आले.
आयुष्य मंत्रालय दिल्ली यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचने प्रमाणे करोना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून हा उपक्रम राबविण्यात आला. करोनाच्या संकटकाळात पोलिसांवर मोठा शारीरिक व मानसिक तणाव आहे. या महामारीशी लढा देताना पोलीस दिवस-रात्र कार्यरत आहे. राज्यातील अनेक पोलिसांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.
त्यामुळ पोलिसांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी या होमियोपैथी गोळ्यांचे वाटप करण्यात आले. औषधांचे पाकिट कारागृहाचे सिनियर जेलर श्यामकांत शेडगे यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले.
यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष संभव काठेड, अध्यक्ष अमित विधाटे, महिला अध्यक्षा शारदा होशिंग, ईश्वर बोरा, श्याम भूमकर, ऍड. हरीश कल्याणी, प्रतीक बोगावत, संदीप बायड, सुमित वाघ, यश मीरांडे आदी उपस्थित होते. यावेळी संघटनेच्या वतीने पोलीस बांधवांना मास्क, सॅनीटायझरचे वाटप करण्यात आले आहे.