पुणे -लॉकडाऊनमुळे सध्या मीटर रिडिंग घेणे बंद असल्यामुळे प्रत्येक ग्राहकांना मोबाइल ऍपद्वारे मीटर रिडिंग पाठविण्याचे महावितरणने आवाहन केले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला असून एप्रिलमध्ये तब्बल 69 हजार 912 वीजग्राहकांनी रिडिंग पाठविले होते.
करोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या कालावधीत महावितरणने गेल्या 23 मार्चपासून वीजग्राहकांकडे जाऊन मीटर रिडिंग घेण्याची प्रक्रिया तात्पुरती बंद केली आहे. रिडिंग उपलब्ध नसल्याने वीजग्राहकांना सरासरीनुसार वीजबिल पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार ज्या ग्राहकाचे मोबाइल क्रमांक आहेत.
त्यांना मोबाइलवर महावितरणच्या वतीने बील पाठविले होते. त्याचवेळी ग्राहकांना स्वत;हून मीटरचे रिडिंग पाठविण्याचे आवाहन केले होते. ज्या ग्राहकांनी मीटर रिडिंग पाठविले. त्यांना तातडीने बील सुद्धा पाठविले आहे. ज्या वीजग्राहकांनी मीटर रिडिंग पाठविलेले नाही. त्यांना सरासरी वीजवापरानुसार बिल देण्यात येत आहे.