नगर -शहरासह जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना पारनेर विधानसभा मतदार संघात आमदार निलेश लंके प्रतिष्ठानच्या पुढाकाराने नागरिकांची रोग प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी होमिओपॅथीचे आर्सेनिक अल्बम 30 गोळ्यांच्या वाटपाचे उपक्रम सुरु आहे. नुकतेच आदर्शगाव हिवरे बाजार येथील ग्रामस्थांना होमिओपॅथीचे आर्सेनिक गोळ्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी आमदार निलेश लंके, आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ.प्रमोद लंके आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.
नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनाने आमदार निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने पारनेर विधानसभा मतदार संघात सुरु असलेले होमिओपॅथीचे आर्सेनिक गोळ्या वाटपाचे उपक्रम कौतुकास्पद असल्याची भावना पोपटराव पवार यांनी व्यक्त केली. आ. लंके यांनी सर्वसामान्य नागरिक केंद्रबिंदू माणून विकासात्मक व आरोग्याच्या दृष्टीने काम सुरु आहे. करोनाला न घाबरता त्याचे संक्रमण रोखण्यासाठी उपाययोजना करुन महामारी हद्दपार करण्याचे आवाहन केले.