येरवडा – श्री स्वामी प्रकटदिन सोहळ्यानिमित्त श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान, समस्त हिंदू आघाडी तसेच श्री शिव समर्थ गोशाळा फाउंडेशन गणेशनगर यांच्या वतीने करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनच्या काळात गरजवंताना धान्य वाटप करण्यात आले.
यावेळी जे गरजवंत आहे अशा गरजू नागरिकांना टोकन दिले जात असून त्यांच्या कुटुंबातील एकाच व्यक्तीला बोलावून ही शिधा देण्यात आली. तसेच प्रकट दिनानिमित्त गोरगरीबांना फळे वाटप करण्यात आले. हा उपक्रम आयोजन समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे, श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक श्री गोविंद स्वामी विजय चिलेवेरी, सामाजिक कार्यकर्त श्रीनिवास चिलेवेरी, संतोष गायकवाड, शिवसमर्थ भगवान अग्रसेन गोशाळा फाउंडेशनचे किसन पाटील यांनी केले होते.