106 नवे रुग्ण आढळले : 184 जणांना घरी सोडले
पुणे – मागील पंधरा दिवसांपासून सलग 200 पार पोहोचलेली करोनाबाधितांची संख्या बुधवारी थेट 106 पर्यंत खाली आली. तर, बाधितांपेक्षा आज घरी सोडलेल्यांची संख्या 184 इतकी आहे. सध्याच्या वातावरणात ही संख्या दिलासा देणारी असून, आतापर्यंत 3 हजार 59 जणांना घरी सोडण्यात आले आहे.
सध्या शहरातील विविध रुग्णालयांत 2 हजार 150 करोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. त्यामध्ये डॉ. नायडू आणि त्याअंतर्गत असलेल्या रुग्णालयांमध्ये 1,536 जणांवर उपचार सुरू आहेत. ससून-146, तर खासगी रुग्णालयात 508 जणांवर उपचार सुरू आहे.
आणखी 11 जणांचा मृत्यू
गेल्या 24 तासांत करोनामुळे 11 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये 37 आणि 38 वर्षीय व्यक्ती सोडले, तर अन्य सर्व मृत व्यक्ती वय वर्षे 50 ते 90 या वयोगटातील आहेत. या सर्व मृतांना अन्य आजारांचा इतिहास आहे.