मुबंई – इंग्लंड क्रिकेट संघ या महिन्यात भारत दौऱ्यावर येणार आहे. दोन्ही संघांमध्ये ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. याआधी इंग्लंड लायन्स संघ भारत अ विरुद्ध तीन व चार दिवसीय सामने खेळणार आहे. हे सामने अहमदाबादमध्ये होणार आहेत. या मालिकेसाठी इंग्लंड लायन्स संघाच्या प्रशिक्षकांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये भारतीय क्रिकेटपटू दिनेश कार्तिकचाही समावेश करण्यात आला आहे.
#INDvAFG 1st T20 : टीम इंडियाच्या प्लेइंग 11 मधून यशस्वी जैस्वाल बाहेर, BCCIने सांगितले ‘हे’ कारण…
इंग्लंडचे पुरुष एलिट वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक नील किलीन हे या दौऱ्यावर इंग्लंड लायन्स संघाचे मुख्य प्रशिक्षक असतील. त्याचबरोबर भारताचा आंतरराष्ट्रीय यष्टीरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिकचा कोचिंग स्टाफमध्ये समावेश करण्यात आला आहे. तो फलंदाजी सल्लागार म्हणून संघात सामील होणार आहे.
इंग्लंड लायन्स विरुद्ध भारत अ मालिकेचे वेळापत्रक
– १२-१४ जानेवारी – इंग्लंड लायन्स विरुद्ध भारत अ, नरेंद्र मोदी स्टेडियम – ग्राउंड ब
– १७-२० जानेवारी – इंग्लंड लायन्स विरुद्ध भारत अ, नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद
– २४-२७ जानेवारी – इंग्लंड लायन्स विरुद्ध भारत अ, नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद
– १-४ फेब्रुवारी – इंग्लंड लायन्स विरुद्ध भारत अ, नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद
दौरा सुरू होण्यापूर्वी दिनेश कार्तिक जवळपास नऊ दिवस संघासोबत असेल. नील किलन हे मुख्य प्रशिक्षक आहेत. सहाय्यक प्रशिक्षक म्हणून रिचर्ड डॉसन व कार्ल पॉहकिन्सन आहेत. फलंदाजी सल्लागार म्हणून इयान बेल आहेत तर, त्यांना मदतनीस प्रशिक्षक म्हणून दीनेश कार्तिकची वर्णि लागली आहे. गोलंदाजी मार्गदर्शनम्हणून ग्रॅमी स्वान काम पाहतील.