Ajit pawar । आगामी लोकसभा निवडणुकीच्या तारखा नुकत्याच जाहीर झाल्या आहेत. राज्यातील महायुतीमधील भाजप पक्षाने आता पर्यंत उमेदरांच्या दोन याद्या जाहीर केल्या आहे. यावरून शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या नेत्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. अशात अजित पवार गटातील नेत्याने राजीनामा देत नाराजी व्यक्त केली आहे.
मिळलेल्या माहितीनुसार, अजित पवार गटातील नेते बजरंग सोनवणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. सोनावणे यांनी सुनील तटकरे यांना पत्र लिहून राजीनामा सादर केला आहे.
Ajit pawar । अजित पवार गटातील नेते नेते बजरंग सोनवणे यांनी पत्रात नेमकं काय लिहिले आहे…
“मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष च्या प्राथमिक सदस्याचा राजीनामा सादर करीत आहे” असा एका ओळीचा मजकूर या पत्रावर लिहिला आहे. तसेच या राजीनाम्याची प्रत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बीडचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांना देखील सुपूर्द करण्यात आली आहे.
Ajit pawar । शरद पवार गटात करणार प्रवेश ?
मिळलेल्या माहितीनुसार, आज बजरंग सोनवणे यांचा पक्ष प्रवेश होईल. ज्योती मेटे यांनी शासकीय सेवेचा राजीनामा दिला आहे. त्या आज शासकीय सेवेतून निवृत्त होत आहेत. आज त्यांचा पण आज शरद पवार गटात पक्ष प्रवेश होऊ शकतो. पक्ष ज्या जागा लढवणार आहे त्याचा सगळा आढावा शरद पवारांनी घेतला आहे, अशी प्रतिक्रिया प्रशांत जगताप यांनी दिली.
Ajit pawar । कोण आहे बजरंग सोनवणे ?
-बीडमधील शेतकरी पुत्र म्हणून बजरंग सोनवणे यांची ओळख आहे. बजरंग सोनवणे यांनी लोकसभेची निवडणूक राष्ट्रवादीकडून लढवली होती. या निवडणुकीत बजरंग सोनवणे यांचा पराभव झाला.
-बजरंग सोनवणे यांनी बीड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले. येडेश्वरी शुगर या खासगी साखर कारखान्याचे ते चेअरमन व कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत. केज विधानसभा मतदार सघात बजरंग सोनवणे यांचा स्वतःचा एक वेगळा गट आहे. बजरंग सोनवणे हे बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष होते. बजरंग सोनवणे यांच्या कन्या डॉक्टर हर्षदा सोनवणे यांचा केज नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये पराभव झाला, तो जिव्हारी लागला. बजरंग सोनावणे हे धनंजय मुंडे यांचा जवळचे मानले जातात.
हे वाचाल का ? काय सांगता…! ‘IT सिटी’त आंघोळीला पाणी नाही, ‘कर्मचाऱ्यांचा कार्यालयात येण्यास नकार’