Lok Sabha Election 2024 । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन स्वतंत्र गट निर्माण झाले. त्यानंतर बारामती लोकसभा मतदार संघात शरद पवार गटाकडून खासदार सुप्रिया सुळेंची लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली.
तर या मतदार संघातून महायुती कडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या संभाव्य उमेदवार असल्याचे मानलं जातंय. या पार्श्वभूमीवर दोन्ही गटाकडून लोकसभेच्या प्रचाराला सुरुवात झालीय.
या दरम्यान बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवार गटाकडूनही प्रचाराला सुरुवात झाली असून या प्रचारात सुनीत्रा पवार यांच्या सह जय पवार दिसून येतात. मात्र यावेळी पार्थ पवार दिसून येत नाही. यावरून पत्रकाराने अजित पवार यांना प्रश्न विचारला पार्थ पवार हे प्रचार यंत्रणेत सहभागी होताना दिसत नाही. यावर अजित पवार म्हणाले की,’ते गुप्त पद्धतीने प्रचार करतात.गनिमी काव्याने प्रचार चालू आहे.’ अस मिश्किलपणे सांगताच उपस्थितामध्ये एकच हशा पिकला.
हे वाचले का ? मराठा समाजातील तरुणांनी विचारला प्रश्न,’नेत्यांना बंदी असताना तुम्ही गावात आलेच कसे ? बैठक न घेताच नेत्यानं सोडलं ‘गाव’