मुंबई – भारतामध्ये कोरोना विषाणूचा विळखा वाढत चालला आहे. कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. देशात आणखी १ हजार ११८ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा ११ हजार ९३३ वर पोहचला आहे. देशात सुरुवातीला २१ दिवसांचा लॉकडाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला होता. आता तो वाढवून ३ मे पर्यंत करण्यात आला आहे.
यातच कोणत्याही मालिका अथवा चित्रपटाचे चित्रीकरण होत नसल्याने सगळेच कलाकार आपापल्या घरात आहेत. कलाकार सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांशी संवाद साधत आहेत. गोपी बहू अर्थात देवोलिना भट्टाचार्य देखील सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. तिने नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला असून याच व्हिडिओची सध्या सगळीकडे चर्चा रंगली आहे.
या व्हिडिओत ती रडत दारू मागताना दिसत आहे. देवोलिनाचा सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ प्रचंड फनी असून या व्हिडिओत ती एका लहान मुलाच्या आवाजात बोलताना दिसत आहे. तसेच ती रडण्याचा अभिनय देखील करत आहे. या व्हिडिओत एक व्यक्ती तिला विचारताना दिसत आहे की, तुला काय पाहिजे, त्यावर देवोलिना अभिनय करत त्याला सांगत आहे की, मला थोडीशी दारू पाहिजे आहे आणि ती पुन्हा जोरजोरात रडताना दिसत आहे.