बिबवेवाडी, दि. 10 (प्रतिनिधी) -पर्वती मतदारसंघात गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी देवेंद्र नॉलेज फाउंडेशनची स्थापन करण्यात आली असून या फाउंडेशनच्या “लोगो’चे अनावरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आवारात करण्यात आले.
माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांच्या संकल्पनेतून वयोगट 1 ते 9 मधील विद्यार्थ्यांसाठी मोफत शिक्षण देण्याच्या उद्देशाने “देवेंद्र नॉलेज फाउंडेशन’ची स्थापना करण्यात आली आहे. या माध्यमातून या शैक्षणिक वर्षापासून मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्यात येणार आहे. ज्या पालकांना आपल्या पाल्यासाठी शिक्षण योजनेचा फायदा घ्यायचा आहे त्यांनी तत्काळ संपर्क साधावा, असे आवाहन फाउंडेशनकडून करण्यात आले आहे. यावेळी चंद्रकांत पाटील, प्रसन्नजित फडवणीस, राजेश पांडे, वैभव वाघ आदी उपस्थित होते
लहान मुलांच्या स्मरणशक्तीला सकारात्मक वाव मिळावा. फक्त पाठांतर करण्यापेक्षाही विद्यार्थ्यांना वस्तूंची ओळख होणे, शब्दशः कळणे गरजेचे आहे. देवेंद्र नॉलेज फाउंडेशनमुळे ज्या शिक्षणासाठी पालकांना लाखो रुपये फी भरावी लागते ते शिक्षण विनामूल्य उपलब्ध करून देत आहोत, याचे समाधान आहे.
– श्रीनाथ भिमाले,
माजी सभागृह नेते, पुणे मनपा