मुंबई – राज्यात सध्या सचिन वाझे प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सीडीआरचा हवाला देत सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. यावरून काँग्रेसने देवेंद्र फडणवीसांना सल्ला दिला आहे.
अधिवेशनादरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी सीडीआर आणि मनसुख हिरेन यांच्या पत्नीचा जबाबाचा हवाला देत सचिन वाझेंवर गंभीर आरोप केले होते. यावरून काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी कर्नाटक उच्च न्यायालयाच्या एका निर्णयाचा हवाला देऊन फडणवीसांना सल्ला दिला आहे.
कर्नाटक उच्च न्यायालयाच्या १५ मार्चच्या निर्णयानुसार आरोपीची खाजगी माहिती तिसऱ्या व्यक्तीला देणाऱ्या अधिकाऱ्याला जबाबदार धरण्यात येईल. देवेंद्र फडणवीसजी मिळालेल्या सीडीआरचा स्त्रोत न सांगून व सीडीआर स्वतः कडे ठेवून, ते २ आरोपींना पाठीशी घालत आहेत. त्यांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये विनंती, असे ट्विट सचिन सावंत यांनी केले आहे.
कर्नाटक उच्च न्यायालयाच्या 15 मार्चच्या निर्णयाने आरोपीची खाजगी माहिती ३ ऱ्या व्यक्तीला देणाऱ्या अधिकाऱ्याला जबाबदार धरण्यात येईल. @Dev_Fadnavis जींना मिळालेल्या CDR चा स्त्रोत न सांगून व CDR स्वतः कडे ठेवून ते २ आरोपींना पाठीशी घालत आहेत. त्यांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये विनंती pic.twitter.com/H1OwuSYUjO
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) March 17, 2021