नवी दिल्ली – करोनामुळे अत्यवस्थ अवस्थेत गेलेले दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांच्यावर आज प्लाझमा थिअरीचा वापर करण्यात आला. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे, असे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
55 वर्षीय जैन यांना काल फारच अत्यवस्थ वाटू लागले आणि त्यांच्यातील ऑक्सिजनचे प्रमाणही कमी झाल्याने त्यांना सरकारी रुग्णालयातून मॅक्स हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. त्यांना करोनाची बाधा झाल्याचे बुधवारी स्पष्ट झाले होते. त्यानंतर त्यांना राजीव गांधी सुपरस्पेशॅलिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना त्यातच निमोनिया झाला असल्याचे निदान तेथील डॉक्टरांनी केले होते. तथापि आता त्यांची प्रकृती स्थीर आहे त्यांच्यावर सतत निरीक्षण ठेवले जात आहे, असेही त्यांनी नमूद केले.