नवी दिल्ली – दिल्लीतील अनाज मंडी परिसरात आज सकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत ४३ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर १५ जण जखमी झाले आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी घटनास्थळी भेट दिली असून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दहा लाखांची मदत देण्याची घोषणा केली आहे.
Delhi CM Arvind Kejriwal: It is a very sad incident. I have ordered a magisterial inquiry into it. Compensation Rs 10 lakhs each to be given to families of those dead and Rs 1 lakh each to those injured. The expense of medical treatment of those injured to be borne by the govt. pic.twitter.com/JytAD9iMOj
— ANI (@ANI) December 8, 2019
अरविंद केजरीवाल यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. तर रुग्णालयात जखमींची विचारपूस केली. यावेळी जखमींना १ लाख रुपये व त्यांच्या सर्व उपचाराचा खर्च दिल्ली सरकारकडून करण्यात येणार आहे. तसेच या प्रकरणी न्यायालयीन चौकशीचे आदेशही केजरीवाल यांनी दिले आहेत.
Delhi Chief Minister Arvind Kejriwal at LNJP Hospital, Delhi: One injured person has received more than 50% burns, 8 others admitted to hospital due to smoke inhalation. Around 15 people are injured in the incident. pic.twitter.com/kpCpJ6Z80Q
— ANI (@ANI) December 8, 2019
Delhi fire incident: Chief Minister of Delhi Arvind Kejriwal met the injured admitted at LNJP hospital #DelhiFire pic.twitter.com/zGH81wp1Qw
— ANI (@ANI) December 8, 2019
दरम्यान, अनाज मंडी परिसरात आज सकाळी भीषण आग असून यामध्ये ४३ जणांचा मृत्यू झाला. तर ५० हून अधिक जणांना वाचवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे.