मुंबई – अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग ही बॉलीवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडी आहे. सोशल मीडियावर ही जोडी नेहमीच सक्रिय असते. अनेक मजेदार व्हिडिओ दीपिका आणि रणवीर शेअर करत असतात. नुकतेच सोशल मीडियावर दीपिकाने एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यात दोन वैवाहिक जीवन दर्शविणारी एका जोडप्याचे मजेदार रील शेअर केली आहे.
इनस्टाग्राम स्टोरीला शेअर केलेला हा व्हिडिओ दीपिकाने रणवीर सिंगला टॅग केला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, पत्नीला साफसफाईचे किंवा इतर काही कामाचे वेड असल्यामुळे तिला थोडा वेळही आराम मिळत नाही. तर तिचा नवरा सतत लॅपटॉपवर काहीतरी ना काही पाहत असतो. हा व्हिडिओ शेअर करत दीपिकाने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘जेव्हा तुम्ही अशा व्यक्तीशी लग्न करता जो आराम करू शकत नाही’. दीपिकाने तिच्या वैवाहिक आयुष्याबद्दल सांगत हा व्हिडिओ शेअर केला आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी दीपिका पदुकोणने रणवीर सिंगसोबत फ्रेंडशिप डे साजरा करणारी एक खास पोस्ट शेअर केली होती. ज्यात त्याने सांगितले की, आपण आपल्या खास मित्राशी लग्न का करावे. दीपिका आणि रणवीरचे लग्न 14 नोव्हेंबर 2018 रोजी अत्यंत शाही पद्धतीने झाले. दोघांच्या लग्नात खूप खर्च झाला होता. दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्या लग्नाचे आयोजन इटलीमध्ये करण्यात आले होते. दोघांनी इटलीतील तिसरे सर्वात मोठे लेक कोमो येथील विला डेल बाल्बियानेलो येथे लग्न केले होते.