पुणे: दीपक शुक्ला (61 किलो) व प्रजापती शालू (49 किलो) यांनी आपापल्या वजनी गटात प्रथम स्थान मिळविले आणि पुणे शहर विभागीय आंतर महाविद्यालयीन वेटलिफ्टिंग स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली.
पुणे शहर क्रीडा समिती अंतर्गत आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालयाकडे या स्पर्धेचे संयोजनपद देण्यात आले होते. या स्पर्धेबरोबरच पॉवरलिफ्टिंग व शरीरसौष्ठव स्पर्धाही आयोजित करण्यात आल्य. या स्पर्धांचे उदघाटन आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. शैला बूटवाला यांच्या हस्ते झाले. यावेळी पुणे शहर विभाग समितीचे सचिव प्रा. अभिजीत पार्से व पूना कॉलेज चे डॉ.अयाझ शेख तसेच आझम स्पोर्टस अकादमीचे संचालक गुलझार शेख हे उपस्थित होते
सविस्तर निकाल-
वेटलिफ्टिंग (मुले)-55 किलोखाली-1. हरी वशिंड, 2.कैलास झा. 61 किलोखाली-1.दीपक शुक्ला, 2.आशिष वाघ. 67 किलोखाली-1. प्रतिक जोशी, 2. सर्फराज शेख. 73 किलोखाली-1. तौसिफ बेग, 2.राज परदेशी. 85 किलोखाली-1. गोरखनाथ वायफलकर. 89 किलोखाली-1. ओंकार पाटोळे. 109 किलोपेक्षा अधिक-1.कुणाल कोरडे, 2.अभिषेक राठोड. मुली-49 किलोखाली-1.शालू प्रजापती, 2.अफशानिशा मुस्ताक अली. 55 किलोखाली-1.रुपाली सिंग, 2.सायली गांधले. 59 किलोखाली-1. अभिलाषा क्षेत्रीय, 2. ऐश्वर्या बोडके. 64 किलोखाली-1. नम्रता तांबे,2. प्राची शिंदे. 71 किलोखाली-1.वैष्णवी ठाकूर
पॉवरलिफ्टिंग-मुली-47 किलोखाली-1.शालू प्रजापती शालू. 52 किलो वजन गट खाली-1.अफशानिशा मुस्ताक अली, 2.साक्षी धुमाळ. 57 किलोखाली-1.रुपाली सिंग,2. देवश्री जाधवराव. 63 किलोखाली-1. प्राची शिंदे, 2.ऐश्वर्या बोडके. 84 किलोखाली-1, अनुष्का शेरडे. मुले- 59 किलोखाली-1. स्वप्नील कुलकर्णी, 2.अमित सेन. 66 किलोखाली -1.मंदार गिते, 2.दीपक शुक्ला. 74 किलाखाली-1.ओंकार खेडकर, 2. आशय मेहेंदळे. 83 किलोखाली-1. प्रणव पोट, 2. अभिषेक मेहेंदळे. 93 किलोखाली-1. रॉनी डिसूजा. 105 किलोखाली-1.सुखेंद्र गोरखा
शरीर सौष्ठव स्पर्धा-60 किलो-1. गंगाराम राठोड,2. आयुष पिंपळे. 65 किलो-1.शुभम जगताप, 2.शुभम गिते.75 किलो- 1.शुभम वाईकर , 2. श्रेयस तनपुरे श्रेयस. 80 किलो- 1.निखिल पाणीकर. 85 किलो-1. श्रीकृष्ण कदम,2.उदयराज हिरवे. 90 किलोवरील-1.वासीम शेख.