पुणे: भारत व दक्षिण आफ्रिका यांच्यात दिनांक 10 ते 14 ऑक्टोबर दरम्यान दुसरा क्रिकेट कसोटी सामना महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) आंतरराष्ट्रीय स्टेडियम (गहुंजे) येथे होणार आहे. या सामन्याची प्रत्येक दिवसाची (डेली) तिकीटे बुधवारपासून विक्रीस उपलब्ध होणार आहेत.
आयसीसी जागतिक कसोटी क्रिकेट अजिंक्यपद 2019-21 स्पर्धेतील हा कसोटी सामना पुण्यामध्ये होत असल्याने या सामन्याचे महत्व ऐतिहासिक ठरणार आहे. या सामन्याच्या ऑनलाईन तिकीट विक्री यापूर्वीच प्रारंभ झाला असून त्यास चांगला प्रतिसाद लाभला आहे. पीवायसी हिंदू जिमखाना, भांडारकर रोड आणि एमसीए स्टेडियम, गहुंजे येथील बॉक्स ऑफीस येथे प्रत्यक्ष तिकीट विक्री सुरू असणार आहे. प्रत्येक दिवसाच्या तिकीट विक्रीचे दर साऊथ पॅव्हेलियन ए आणि बी स्टॅंड 2 हजार रूपये, साऊथ अप्पर- 600 रूपये, साऊथ लोअर – एक हजार रूपये, नॉर्थ स्टॅंड- 1 हजार रूपये, नॉर्थ वेस्ट आणि नॉर्थ ईस्ट स्टॅंड-800 रूपये, साऊथ वेस्ट आणि साऊथ ईस्ट स्टॅंड- 800 रूपये, ईस्ट स्टॅंड आणि वेस्ट स्टॅंड- 400 रूपये असे आहेत.