मुंबई : अभिनेत्री आणि सोशल मीडिया स्टार उर्फी जावेद ही तिच्या फॅशनच्या हटके स्टाईलने रोज चर्चेत राहत असते. दरम्यान, उर्फीला चक्क जीवे मारण्याची आणि बलात्काराची धमकी देण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. अश्लील भाषेत शिवीगाळ करून उर्फीला बलात्काराची आणि जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
व्हॉट्सअॅपवर कॉलवरुन अश्लील भाषेत शिवीगाळ करून उर्फीला बलात्काराची आणि जिवे मारण्यातची धमकी देण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच तिच्या फॅशन स्टाईलबद्दल देखील या कॉलमध्ये कमेंट करण्यात आली. या प्रकरणी गोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आली आहे.
नवीन गिरी नावाच्या व्यक्तीविरोधात गोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहेत. या प्रकरणात आतापर्यंत कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. उर्फी ही तिच्या फॅशनमुळे आणि अतरंगी स्टाईलमुळे चर्चेत असते. उर्फी ही सोशल मीडियावर वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते.
अॅक्टिंग, मॉडेलिंग आणि जाहिरातींमध्ये उर्फी काम करते. दुर्गा, सात फेरों की हेराफेरी, बेपनाह, जीजी मां, डायन, ये रिश्ता क्या कहलाता है, पंच बीट सीजन 2 आणि कसौटी जिंदगी की या प्रसिद्ध मालिकांमध्ये उर्फीनं काम केलं आहे. उर्फीच्या सोशल मीडियावरील पोस्टला देखील नेटकऱ्यांची पसंती मिळते. उर्फीला बिग बॉस ओटीटी या शोमुळे विशेष लोकप्रियता मिळाली. उर्फीच्या सोशल मीडियावरील पोस्टला देखील नेटकऱ्यांची पसंती मिळते. तिला इंस्टाग्रामवर 3.9M मिलियनपेक्षा जास्त फोलवर्स आहेत. नुकतीच ‘मोस्ट सर्च्ड एशियन ऑन गूगल 2022’ही यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये उर्फी ही 43 व्या क्रमांकावर आहे.