पुणे – राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर चिंचवड दौऱ्यादरम्यान शाईफेक करण्यात आली होती. या प्रकरणाचे पडसाद गेल्या काही दिवसात राज्यभर उमटले. अशातच पिंपरी चिंचवड येथे मंत्री चंद्रकांत पाटील यांचा दौरा होता. पुन्हा शाईफेकण्याची धमकी सोशल मीडियातून देण्यात आली होती.
अशातच चंद्रकांत पाटील खबरदारी म्हणून फेसशिल्ड वापरू लागलेत. त्यांचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. पुन्हा शाईफेकीच्या धमकीमुळे चंद्रकांत पाटील फेसशिल्ड लावून पोहचले होते.
याआधीच्या घटनेत चंद्रकांत पाटील यांच्या डोळ्यात शाई गेली होती. काही काळापूर्वी चंद्रकांत पाटील यांच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया झाली. त्यावेळी डोळ्याचा कँसर झाला होता. त्यामुळं डोळा गोधळीसारखा शिवलेला आहे. शाईफेकीनंतर डोळ्यांच्या पापन्यांवर शाई चिपकली होती. डॉक्टरांनी ती क्लीन करून दिली. नशीब डोळ्याला काही झालं नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.
दरम्यान, शाईफेक प्रकरणी पोलिसांनी मनोज भास्कर घरबडे ( समता सैनिक दल संघटक), धनंजय भाऊसाहेब इजगज (समता सैनिक दल सदस्य) आणि विजय धर्मा ओव्हाळ (वंचित बहुजन आघाडी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर अटकेची कारवाई करण्यात आली.