ठाणे – एका 34 वर्षीय इसमाला करोनाची बाधा झाल्याच्या संशयाने त्याला जमावाने मारहाण केली त्यात त्या इसमाचा मृत्यू झाला आहे. गणेश गुप्ता असे या इसमाचे नाव आहे. हा इसम बुधवारी सकाळी आपल्या घरातून काहीं किराणा माल आणण्यासाठी बाहेर पडला होता. तथापि त्यावेळी रस्त्यावर काही पोलीस उभे असल्याचे बघून तो दुसऱ्या वाटेवरून जात असताना तेथे उभ्या असलेल्या लोकांनी त्याला खोकताना पाहिले आणि तो करोनाचा संशयित असल्याच्या संशयावरून त्याला बेदम मारहाण केली.
त्याला तेथील गटारात फेकून देऊन हा जमाव पांगला. तेथेच हा इसम मरण पावला. या प्रकरणात खडकपाडा पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाला असून त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकरणात अजून कोणाला अटक करण्यात आलेली नाही.