डिकसळ (वार्ताहर) : भिगवण (ता. इंदापूर) येथील वर्कशॉप मध्ये वेल्डरचे काम करणाऱ्या २२ वर्षीय तरुणाचा गुरुवारी (दि,१८)रोजी सायंकाळी चारच्या सुमारास म्रुत्यु झाला.
यामध्ये संग्राम बिभिषन कन्हेरकर ( वय 22, रा खानोटा ता दौड ) असे तरुणाचे नाव आहे याबाबत भिगवण पोलिस स्टेशनला संग्रामचे चुलते रामचंद्र निवृत्ती कन्हेरकर( रा खोनाटा ता दौड) यांनी कळविले संग्राम हा भिगवण गावचे हद्दीतील अप्सर फैब्रिकेशन नावाचे वर्कशॉपमध्ये काम करित असताना त्यास इलेक्ट्रीक करन्ट बसुन तो बेशुध्द झाला. त्याला औषध उपचारासाठी खाजगी हॉस्पिटलमध्ये नेले असता उपचारपुर्वीच मयत झाल्याचे निदान झाले. पुढील तपास भिगवण पोलिसस्टेशनचे सहा फौजदार अविनाश काळे हे करित आहेत .