सध्या करोनामुळे संपूर्ण जग ठप्प झाले असून सर्वजण सोशल मीडियावर ऍक्टिव्ह झाले आहेत. अशात ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरचे भारत आणि बॉलीवूड प्रेम दिवसेंदिवस वाढत चाललेले पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी त्याचा बाहुबलीवाला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर आता आणखी एका बॉलीवूड गाण्यावर डान्स करतानाचा वॉर्नरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
Who was better @candywarner1 and I or @theshilpashetty 😂😂 #theoriginals @prabhudevaofficial
डेव्हिड वॉर्नरने आता नव्या टिकटॉक व्हिडिओसह चाहत्यांच्या भेटीला आला आहे. या व्हिडिओमध्ये बॉलिवूड सुपरस्टार प्रभूदेवाचे आयकॉनिक सॉंग “मुकाबला’वर पत्नी आणि मुलीसोबत डान्स केला. एवढंच नाही तर त्याने या व्हिडिओमध्ये शिल्पा शेट्टीला सुद्धा टॅग केले आहे.
याआधी डेव्हिड वॉर्नरने बाहुबलीचा वेश करुन या सिनेमातला डायलॉग म्हटला होता. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. एवढंच नाही तर या व्हिडीओवरुन भारतीय क्रिकेटर सुरेश रैना आणि इरफान पठाण यांनीही त्याची फिरकी घेतली होती.
लॉकडाऊनमुळे वॉर्नर सध्या त्याच्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. यासोबतच तो सोशल मीडियावरही खूप सक्रिय झाला आहे. त्याचे बॉलीवूड गाण्यांचे टिकटॉक व्हिडिओ अनेकदा व्हायरल होताना दिसत असतात. वॉर्नरचा भारतातही मोठा चाहता वर्ग आहे.