World Cup 2023 Pakistan vs South Africa Match Toss Update & Playing 11 : विश्वचषकाच्या २६व्या सामन्यात पाकिस्तानसमोर दक्षिण आफ्रिकेचे आव्हान आहे. दोन्ही संघांमधील हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जात आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
PAK vs SA Live Score : शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा, पाकिस्तान संघानं 25 षटकात 3 बाद 129 धावा अशी मजल मारली आहे. सध्या क्रीजवर बाबर आझम 47*(60) आणि इफ्तिखार अहमद 21*(30) धावांवर खेळत आहेत.
पाकला तिसरा धक्का,…
मोहम्मद रिझवानच्या रूपाने पाकिस्तानला तिसरा धक्का बसला. 16व्या षटकातील पाचव्या चेंडूवर रिझवानला जेराल्ड कोएत्झीने बाद केले. त्याने 27 चेंडूत 31 धावा केल्या. यादरम्यान रिझवानने चार चौकार आणि एक षटकार लगावला.
इमाम उल हकच्या रूपाने पाकिस्तानला दुसरा धक्का बसला. सातव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर इमाम बाद झाला. मार्को जॅनसेनच्या चेंडूवर तो हेनरिक क्लासेनवी झेलबाद झाला. इमामने 18 चेंडूत 12 धावा केल्या.
पाकिस्तानने पहिली विकेट 4.3 षटकात 20 धावांवर गमावली. गेल्या सामन्यात अर्धशतक झळकावणारा पाकिस्तानचा सलामीवीर फलंदाज अब्दुल्ला शफीक यानं या सामन्यात फलंदाजीत निराशा केली. अब्दुल्ला 17 चेंडूत नऊ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. मार्को जॅनसेनच्या शॉर्ट बॉलला सीमारेषेबाहेर पाठवण्याच्या प्रयत्नात तो लुंगी एनगिडीकरवी झेलबाद झाला.
पाकिस्ताननं टाॅस जिंकला…
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. (Pakistan win the toss and elect to bat first) बाबरने सांगितले की, संघात दोन बदल करण्यात आले आहेत. उजव्या हाताचा फिरकी गोलंदाज उसामा मीरच्या जागी डावखुरा फिरकीपटू मोहम्मद नवाजचा संघात समावेश करण्यात आला असून वेगवान गोलंदाज हसन अलीच्या जागी मोहम्मद वसीम ज्युनियरचा संघात समावेश करण्यात आला आहे. हसन अली तापामुळे खेळत नाही. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेने तीन बदल केले आहेत. या सामन्यात रीझा हेंड्रिक्स, लिझार्ड विल्यम्स आणि कागिसो रबाजा खेळत नाहीत. नियमित कर्णधार टेंबा बावुमा, फिरकी गोलंदाज तबरेझ शम्सी आणि वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडी परतले आहेत.
#CWC23 #PAKvSA : पाकचा फलंदाजीचा निर्णय; दोन्हीही संघात मोठे बदल, जाणून घ्या..Playing 11
PAK vs SA : दोन्ही संघांचे Playing11 :-
दक्षिण आफ्रिका : क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), टेम्बा बावुमा (कर्णधार), रॅसी व्हॅन डर डुसेन, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅन्सन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, तबरेझ शम्सी, लुंगी एनगिडी.
पाकिस्तान : अब्दुल्ला शफीक, इमाम उल हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), सौद शकील, शादाब खान, इफ्तिखार अहमद, मोहम्मद नवाज, शाहीन आफ्रिदी, मोहम्मद वसीम जूनियर, हरिस रौफ.
#CWC23 #PAKvSA : पाकिस्ताननं Toss जिंकला; कर्णधार आझमनं घेतला ‘हा’ निर्णय…
दरम्यान, या विश्वचषकात पाकिस्तान संघाने पाचपैकी दोन सामने जिंकले आहेत. गुणतालिकेत पाक संघ सहाव्या स्थानावर आहे. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिका पाचपैकी चार सामने जिंकून दुसऱ्या स्थानावर आहे.