Koffee With Karan 8 – अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) नुकतेच करण जोहरच्या (Karan Johar) चॅट शो “कॉफी विथ करण 8′ (Koffee With Karan 8) च्या पहिल्या एपिसोडमध्ये दिसले होते. या शोमध्ये दोघांनी एकमेकांबद्दल अनेक खुलासे केले. तसेच करण जोहरच्या अनेक प्रश्नांची उत्तरे देखील दिली.
Ranveer Bechara! Khulle main Izzat Lut Gayee! pic.twitter.com/jdgdQDvfLh
— KRK (@kamaalrkhan) October 27, 2023
मात्र, जेव्हा दीपिका पदुकोणने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल वेगवेगळे खुलासे करण्यास सुरुवात केली तेव्हा, तिचा पती रणवीर सिंगच्या चेहऱ्यावरील भाव बदल्याचे दिसून आले. यावेळी अभिनेत्याच्या चेहऱ्यावर रागही स्पष्ट दिसत होता. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.
झालं असं की, कॉफी विथ करणच्या 8 व्या भागात दीपिका पदुकोणने खुलासा केला आहे की, लग्नापूर्वी ती रणवीरसोबत आणखी 4 लोकांना डेट करत होती. कारण लग्नाच्या प्रस्तावापूर्वी दोघांनीही ओपन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय घेतला होता.
अशा स्थितीत दीपिका म्हणाली, जोपर्यंत रणवीरने मला प्रपोज केले नव्हते. याआधी आमच्यात कोणतीही कमिटमेंट नव्हती, त्यामुळे मी इतर लोकांनाही भेटायचे. पण, मी भेटलेल्या सगळ्यांपैकी कोणीही मला खास वाटले नाही.
मी इतरांना भेटायचे, पण मी रणवीरसोबत आहे, मला त्याच्याकडे परत जायचे आहे आणि मी त्याच्याकडे परत जाणार आहे, हे नेहमी माझ्या मनात असायचे.’ असं दीपिका यावेळी म्हणाली.
अभिनेत्रीचे हे ऐकल्यानंतर करण जोहरने दीपिका पदुकोणला रणवीर सिंगसोबत डेट करत असलेल्या लोकांची नावे विचारली. या प्रश्नाचे उत्तर देताना अभिनेत्री म्हणाली की, ‘आता मला ते लोक आठवत नाहीत’. दीपिका पदुकोणचे हे उत्तर ऐकल्यानंतर रणवीर सिंह थोडा रागावला आणि म्हणाला,
‘आत्ताच तू म्हणत होतीस की माझ्यासोबत राहूनही तू इतर लोकांना पाहत होतीस आणि आता ते तुला आठवत नाहीत, पण, मला चांगले आठवते…’ रणवीरची ही प्रतिक्रिया सोशल मीडियावरही व्हायरल होत असून, यावर नेटकरी देखील मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया देत आहेत.