World Cup 2023 Pakistan vs South Africa Match Toss Update : विश्वचषकाच्या २६व्या सामन्यात पाकिस्तानसमोर दक्षिण आफ्रिकेचे आव्हान आहे. दोन्ही संघांमधील हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जात आहे.हा सामना दुपारी 2 वाजता सुरू होईल.
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.(Pakistan win the toss and elect to bat first) बाबरने सांगितले की, संघात दोन बदल करण्यात आले आहेत. उजव्या हाताचा फिरकी गोलंदाज उसामा मीरच्या जागी डावखुरा फिरकीपटू मोहम्मद नवाजचा संघात समावेश करण्यात आला असून वेगवान गोलंदाज हसन अलीच्या जागी मोहम्मद वसीम ज्युनियरचा संघात समावेश करण्यात आला आहे. हसन अली तापामुळे खेळत नाही.
दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेने तीन बदल केले आहेत. या सामन्यात रीझा हेंड्रिक्स, लिझार्ड विल्यम्स आणि कागिसो रबाजा खेळत नाहीत. नियमित कर्णधार टेंबा बावुमा, फिरकी गोलंदाज तबरेझ शम्सी आणि वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडी परतले आहेत.