Rahul Gandhi – कॉंग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi), दोन दिवस छत्तीसगडमध्ये (Chhattisgarh) निवडणूक प्रचार दौरा करणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ते 28 ऑक्टोबर रोजी कांकेर, राजनांदगाव आणि भानुप्रतापूर येथे सभांना संबोधित करणार आहेत.
तसेच ते 29 ऑक्टोबर रोजी कावर्धा येथे सभेला संबोधित करणार आहेत. कॉंग्रेसने अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या कांकेर (एसटी) मतदारसंघातून शंकर ध्रुव यांना उमेदवारी दिली आहे.
त्यांनी राजनांदगावमधून गिरीश देवांगण आणि भानुप्रतापपूर (एसटी) या राखीव मतदारसंघातून सावित्री मांडवी यांना उमेदवारी दिली आहे.
छत्तीसगडचे भूपेश बघेल मंत्रिमंडळातील एकमेव मुस्लिम मंत्री मोहम्मद अकबर हे कावर्धामधून कॉंग्रेसचे उमेदवार आहेत.छत्तीसगड मधे दोन टप्प्यात मतदान होणार असून त्यातील पहिल्या टप्प्याचे मतदान 7 नोव्हेंबरला होणार आहे.