World Cup 2023 Pakistan vs Bangladesh Match Toss Update : विश्वचषक 2023 च्या 31व्या सामन्यात आज पाकिस्तानचा सामना बांगलादेशशी होत आहे. हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळला जात आहे. या विश्वचषकातील बांगलादेशचा प्रवास जवळपास संपला आहे.त्याच वेळी, आता तिन्ही सामने पाकिस्तानसाठी करा किंवा मरोचे असणार आहेत. एका पराभवानेही त्यांचा उपांत्य फेरीचा मार्ग बंद होऊ शकतो.
बांगलादेशचा कर्णधार शकिब अल हसन याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. शाकिबने प्लेइंग-11 मध्ये एक बदल केला आहे. मेहदी हसनच्या जागी तौहीद हृदयाचा प्लेइंग-11 मध्ये समावेश करण्यात आला आहे.
त्याचबरोबर पाकिस्तानने तीन बदल केले आहेत. इमाम उल हक, शादाब खान आणि मोहम्मद नवाज यांना प्लेइंग-11 मधून वगळण्यात आले आहे. त्यांच्या जागी फखर जमान, उसामा मीर आणि आगा सलमानला प्लेइंग-11 मध्ये स्थान देण्यात आले आहे.
दरम्यान,बांगलादेशचा संघ आतापर्यंत सहा सामने खेळला असून एक विजय आणि पाच पराभवांसह गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे. त्याचे दोन गुण आणि निव्वळ धावगती -1.338 आहे. संघ विश्वचषकातून जवळपास बाहेर पडला आहे. त्याचबरोबर पाकिस्तानचे सहा सामन्यांत दोन विजयांसह चार गुण आहेत. त्याने चार सामने गमावले आहेत आणि त्याचा निव्वळ धावगती -0.387 आहे. पाकिस्तानला येथून सर्व सामने जिंकावे लागतील आणि इतर संघांच्या निकालावरही अवलंबून राहावे लागेल.