Kartik Aaryan – बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनच्या फॅन फॉलोइंगचा कमी वेळात वाढला आहे. बॅक टू बॅक ब्लॉकबस्टर हिट चित्रपट देऊन कार्तिक आर्यन आज बॉलिवूडमधील सर्वात पात्र बॅचलर बनला आहे. मुली त्याच्या मोहकतेबद्दल अधिक वेड्या आहे. बॉलीवूडच्या हॅंडसम हंक कार्तिकसाठी महिला चाहत्या अनेकवेळा वेडेपणा करताना दिसल्या आहे. अशात कार्तिक आर्यनने सांगितले की त्याला कशी मुलगी जोडीदार म्हणून हवीये.
या कार्यक्रमादरम्यान कार्तिक आर्यनला त्याच्या सध्याच्या रिलेशनशिप स्टेटस बाबत प्रश्न विचारण्यात आला, यावर कार्तिकने हसून स्वतःला सिंगल असल्याचे सांगितले. दरम्यान कार्तिक एकेकाळी सारा अली खानसोबत रिलेशनशिपमध्ये होता, पण नंतर काही कारणास्तव ते दोघे वेगळे झाले आणि तेव्हापासून कार्तिक आर्यन सिंगल आहे. पण कार्तिक आर्यनला स्वतःसाठी कशी मुलगी हवी आहे? यावर तो मोकळेपणाने बोलला.
कार्तिकने सांगितले की ‘त्याला करीना कपूर खान आणि प्रियांका चोप्रा जोनास यांच्या सारखी मुलगी हवीये. जेव्हा कार्तिक आर्यनला श्रीमंत, प्रतिभावान, सुंदर आणि मजेदार या श्रेणीत ठेवता येईल अशा अभिनेत्रींची नावे विचारण्यात आली तेव्हा कार्तिक आर्यन म्हणाला की त्याला करीना कपूर खान खूप सुंदर आणि रवीना टंडन मजेदार वाटते.’ असं म्हणत त्याने करीन आणि प्रियांका सारखी मुलगी जोडीदार म्हणून हवीये असं सांगितलं.