KKR vs RR Live Score : आज आयपीएल 2024 चा 31 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात ईडन गार्डन्सवर खेळला जात आहे. संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना कोलकाताने सुनील नरेनच्या झंझावाती शतकी खेळीच्या जोरावर राजस्थान विरुद्ध 20 षटकांत 6 बाद 223 धावा केल्या आहेत. आता राजस्थानसमोर विजयासाठी 224 धावांचे लक्ष्य ठेवलं आहे.
केकेआरकडून सुनील नरेनने 56 चेंडूत 109 धावांची खेळी खेळली. नरेनने आपल्या शतकी खेळीत 11 चौकार आणि 6 षटकार मारले. त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील हे पहिले शतक आहे.
नरेननंतर आंगकृष्ण रघुवंशीने सर्वाधिक 30 धावा केल्या. शेवटी रिंकू सिंग 9 चेंडूत 20 धावा काढून नाबाद परतला. रिंकूने एक चौकार आणि दोन षटकार मारले.
राजस्थानकडून आवेश खान आणि कुलदीप सेन यांनी प्रत्येकी दोन तर ट्रेंट बोल्ट आणि युझवेंद्र चहल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली