साऊथ सिनेसृष्टीतील अभिनेता कालिदास जयराम याने त्याची गर्लफ्रेंड तारिणी कलिंगरायर हिच्याशी गुपचूप साखरपूडा केला आहे. त्याने 11 नोव्हेंबर 2023 रोजी सोशल मीडियावर फोटो शेअर करत चाहत्यांना ही बातमी दिली आहे. त्यामुळे चाहत्यांना सुखद धक्काच बसला आहे. त्याच्या या पोस्टनंतर दोघांवरही शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तारिणी आणि कालिदास बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. अखेर त्यांनी साखरपुडा करण्याचा निर्णय घेतला.
सोशल मीडियावर शेअर केलेल्या या फोटोत कालिदास आणि तारिणीची जोडी फारच सुंदर दिसत आहे. हे फोटो सोशल मीडियावर शेयर करत कालिदासने कॅप्शनमध्ये लिहिले की, “आम्ही एंगेज झालो.” यातील एका फोटोत एकमेकांचा हात धरुन कालिदास आणि तारिणी यांनी पोज दिली आहे. या खास दिवशी तारिणी आणि कालिदासने पीच रंगाचा ड्रेस घातला होता. तारिणीने लेहेंगा तर कालिदासने पारंपारिक लूक केला होता.
View this post on Instagram
सध्या दोघांचे हे फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत असून नेटकरी त्यांचे अभिनंदन करत आहेत. कालिदासच्या होणाऱ्या पत्नीबद्दल बोलायचं झालं तर तारिणी एक मॉडेल आहे. 2021 मध्ये ती मिस युनिव्हर्स इंडियाची तिसरी उपविजेती ठरली होती. तर कालिदासने बालकलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. आता कालिदास कमल हासनसोबत ‘डी50’ आणि ‘इंडियन 2’मध्ये दिसणार आहे. याआधी कालिदासने ‘विक्रम’, ‘हॅपी सरदार’ आणि ‘पूमाराम’ सारख्या चित्रपटात काम केलेल्या काम केले आहे.