ICC World Cup 2023 Points Table List : रविवारी चेन्नईच्या चेपॉक मैदानावर झालेल्या विश्वचषक स्पर्धेच्या पाचव्या सामन्यामध्ये टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 6 विकेट्सने पराभव केला. टीम इंडियाच्या या विजयानंतर वर्ल्डकपच्या पॉईंट्स टेबलमध्ये फेरबदल झाले आहेत. ऑस्ट्रेलियाला नमवून टीम इंडियाने पॉईंट्स टेबलमध्ये पाचवं स्थान पटकावलं आहे. यावेळी टीम इंडियाच्या खात्यात 2 गुण जमा झाले आहेत.
गुणतालिकेत संघाची स्थिती..
सध्याच्या गुणतालिकेत भारत, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान आणि बांगलादेश यांचे प्रत्येकी दोन गुण आहेत. न्यूझीलंड संघ सध्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. पहिल्या सामन्यात त्यांनी इंग्लंडचा नऊ विकेट्सने पराभव केला. किवी संघाचा नेट रन रेट सर्वोत्तम आहे. संघाचा नेट रन रेट +2.149 आहे. त्याच वेळी, दक्षिण आफ्रिका संघ +2.040 च्या निव्वळ धावगतीने(Net Run Rate) दुसऱ्या स्थानावर आहे. आफ्रिकन संघाने पहिल्या सामन्यात श्रीलंकेचा 102 धावांनी पराभव केला होता. पाकिस्तान संघ तिसऱ्या स्थानावर आहे. त्याचा नेट रन रेट +1.620 आहे. पहिल्या सामन्यात नेदरलँडचा 81 धावांनी पराभव केला आहे. त्याचबरोबर बांगलादेशचा संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानचा त्यांनी सहा गडी राखून पराभव केला. शकिब अल हसनच्या संघाचा नेट रन रेट +1.438 आहे. भारतीय संघ खालच्या पाचव्या स्थानावर आहे. भारताचा नेट रन रेट(RunRate) +0.883 आहे.
New Zealand are top of the standings after the first round of matches 🇳🇿#CWC23 stats 👉https://t.co/HEPMdZQumg pic.twitter.com/tU7SWKjVbP
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) October 9, 2023
मात्र, स्पर्धेचा प्रारंभिक टप्पा असल्याने नेट रन रेटची लढाई अद्याप आलेली नाही. भविष्यात अनेक मोठे बदल पाहायला मिळतील. प्रत्येक संघासाठी नेट रनरेटपेक्षा विजय महत्त्वाचा असतो. जर एखाद्या संघाने आपले सर्व नऊ सामने जिंकले तर ते प्रथम स्थान मिळवून सहज पात्र ठरतील.
सेमीफायनल गाठण्यासाठीचं समीकरण…
या सामन्यासह सर्व 10 संघांनी प्रत्येकी एक सामना खेळला आहे. आतापर्यंत, पाच संघांनी गुणतालिकेत खाती उघडली आहेत, तर पाच संघ त्यांच्या पहिल्या गुणांच्या प्रतीक्षेत आहेत. वर्ल्ड कप 2019 प्रमाणे हा राऊंड रॉबिन फॉरमॅटमध्ये खेळला जात आहे, म्हणजेच सर्व 10 संघ एकमेकांविरुद्ध खेळताना दिसतील. साखळी फेरीत, एक संघ नऊ सामने खेळेल आणि सर्वाधिक गुण मिळवणारे चार संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. 9 पैकी 7 सामने जिंकणाऱ्या टीमला उपांत्य फेरी गाठणं सोपं जाऊ शकतं. प्रत्येक संघाला त्यांच्या रन रेटकडे (NRR)लक्ष द्यावं लागणार आहे. पावसामुळे सामना रद्द झाला किंवा गुण आपापसात वाटून घ्यावे लागले, तर ज्या संघाचं नेट रनरेट चांगला असेल तोच संघ पुढे जाईल. कोणताही संघ जास्तीत जास्त 18 गुण मिळवू शकतो. पहिला उपांत्य सामना पॉईंट्स टेबलमधील पहिल्या आणि चौथ्या क्रमांकाच्या संघामध्ये खेळला जाईल. तर दुसरा उपांत्य सामना पॉइंट टेबलच्या दुस-या आणि तिसर्या क्रमांकाच्या संघामध्ये खेळला जाईल.
दरम्यान, सामन्यातील विजयी संघास दोन गुण मिळतात, तर पराभूत टीमला गुण मिळत नाही. जर सामना रद्द झाला तर दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण मिळणार आहेत. या गुणांव्यतिरिक्त, संघांना अनेकदा नेट रन नेट (NRR) च्या आधारे क्रमवारी दिली जाते. सामन्यातील प्रत्येक संघाच्या कामगिरीवर नेट रन रेट बनतो किंवा ब्रेक होतो. गुण समान असल्यास, नेट रनरेटच्या दृष्टीने संघाला प्राधान्य दिलं जातं.
हे संघ गुणतालिकेत आहेत तळाशी …
त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, नेदरलँड्स, श्रीलंका आणि इंग्लंड यांचे एकही गुण नाहीत. ज्या संघांनी गुण मिळवले नाहीत त्यांचा क्रम गुण मिळविणाऱ्या संघांसारखाच असतो. म्हणजेच भारत पाचव्या स्थानावर असेल तर हरणारा संघ सहाव्या स्थानावर असेल. ऑस्ट्रेलियाचा निव्वळ रन रेट -0.883 आहे. त्याचवेळी चौथ्या स्थानावर असलेल्या सध्याच्या बांगलादेशकडून पराभूत झालेला अफगाणिस्तान सातव्या स्थानावर आहे. त्याचा नेट रन रेट -1.438 आहे. नेदरलँड्स -1.620 च्या नेट रन रेटसह आठव्या, श्रीलंका -2.040 च्या नेट रन रेटसह नवव्या आणि न्यूझीलंडकडून पराभूत झालेला इंग्लिश संघ -2.149 च्या नेट रन रेटसह 10 व्या स्थानावर आहे.