MP ABP Cvoter Opinion Poll 2023: निवडणूक आयोगाने मध्य प्रदेशसह देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. निवडणुकीपूर्वी अनेक प्रकारचे सर्वेक्षण समोर येत आहे. एबीपी न्यूज सी-व्होटर सर्वेक्षण जाहीर करण्यात आले आहे. या सर्वेक्षणात जनतेने आश्चर्यकारक उत्तरे दिली आहेत.
ओपिनियन पोलमध्ये मध्य प्रदेशातील जनतेला यावेळी कोणते सरकार पाहायचे आहे, असा प्रश्न विचारण्यात आला होता. याबाबत जनतेतून आलेल्या प्रतिक्रिया आश्चर्यकारक आहेत. सर्वेक्षणानुसार, यावेळी मध्य प्रदेशातील 230 जागांपैकी काँग्रेसला 113-125 जागा, भाजपला 104-116, बसपाला 0-2 तर इतरांना 0-3 जागा मिळू शकतात.
व्होट शेअर सर्वेक्षणानुसार, यावेळी मध्य प्रदेशात काँग्रेसला 45 टक्के, भाजपला 45 टक्के, बसपाला 2 टक्के आणि इतरांना 8 टक्के मते मिळत आहेत.
मध्य प्रदेशचा ओपिनियन पोल –
एकूण जागा – 230
काँग्रेस-113-125
भाजपा-104-116
बसपा-0-2
इतर-0-3
मध्य प्रदेशात मतांची टक्केवारी
एकूण जागा – 230
काँग्रेस-45%
भाजप-45%
BSP-2%
इतर-8%
निवडणूक आयोगाने आज दिलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशमध्ये 17 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल 3 डिसेंबरला जाहीर होणार आहे.
मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा, मिझोराममध्ये निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. एबीपी न्यूज सी व्होटरने ओपिनियन पोल केला आहे. यामध्ये सुमारे 90 हजार लोकांची मते जाणून घेण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर दरम्यान हे सर्वेक्षण करण्यात आले. सर्वेक्षणातील त्रुटीचे मार्जिन अधिक उणे 3 ते अधिक उणे 5 टक्के आहे.