World Cup 2023 England vs Sri Lanka Live Score : विश्वचषकाच्या 25व्या सामन्यात श्रीलंकेसमोर गतविजेत्या इंग्लंडचे आव्हान आहे. दोन्ही संघांमधील हा सामना बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जात आहे. या स्पर्धेत इंग्लंड आणि श्रीलंका या दोन्ही संघांनी आतापर्यंत प्रत्येकी चार सामने खेळले आहेत. दोघांनाही प्रत्येकी एक विजय मिळाला आहे.
प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडचा संघ 156 धावांवर गारद झाला. 2019 मध्ये विश्वविजेता बनलेल्या संघासाठी हा विश्वचषक खूपच वाईट ठरला आहे. या सामन्यातही हा संघ केवळ 33.2 षटकेच खेळू शकला. बेन स्टोक्सने सर्वाधिक 43 धावा केल्या. त्याच्याशिवाय जॉनी बेअरस्टोने 30 आणि डेव्हिड मलानने 28 धावा केल्या. श्रीलंकेकडून लाहिरू कुमाराने तीन बळी घेतले. अँजेलो मॅथ्यूज आणि कसून रजिताने प्रत्येकी दोन गडी बाद केले. तिक्ष्णाने एक विकेट घेतली.
Sri Lankan bowlers on fire! 🔥🔥🔥
England’s batters held to 156. Now, it’s our turn to roar! 🏏🦁#LankanLions #SLvENG #CWC23 pic.twitter.com/dYG2EBelBI— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) October 26, 2023
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडने चांगली सुरुवात केली. जॉनी बेअरस्टो आणि डेविड मलान या जोडीने वेगवान सुरुवात करून पहिल्या विकेटसाठी 45 धावा जोडल्या. मालन 28 धावा करून अँजेलो मॅथ्यूजचा बळी ठरला. मात्र, यानंतर विकेट्सची झुंबड उडाली. जो रूट तीन धावा करून धावबाद झाला. बेअरस्टोला 30 धावांवर कसून राजिथाने बाद केले. कर्णधार बटलर आठ धावा करून तर लिव्हिंगस्टोन एक धावा करून बाद झाला.
85 धावांत पाच गडी गमावल्यानंतर इंग्लंडचा संघ संघर्ष करत होता. मात्र, बेन स्टोक्स एका टोकाला उभा होता. अशा स्थितीत इंग्लिश फलंदाजांकडून बुद्धिमान फलंदाजीची अपेक्षा होती, मात्र तसे झाले नाही. इंग्लंडचे फलंदाज खराब फटके खेळून विकेट्स देत राहिले. मोईन अली 15, ख्रिस वोक्स 0 आणि आदिल रशीद 2 धावा करून बाद झाले. दरम्यान, बेन स्टोक्सही वैयक्तिक 43 धावांवर खेळत राहिला. रशीदने निष्काळजीपणामुळे विकेट गमावली. शेवटी मार्क वुडही पाच धावा करून बाद झाला. विली 14 धावा करून नाबाद राहिला.
श्रीलंकेकडून लाहिरू कुमाराने 7 षटकात 35 धावा देताना सर्वाधिक तीन बळी घेतले. अँजेलो मॅथ्यूज आणि कसून रजिताने प्रत्येकी दोन गडी बाद केले. मॅथ्यूजनं 5 षटकात 14 तर रजिताने 7 षटकात 36 धावा दिल्या. तिक्ष्णाने एक विकेट घेतली, त्यानं 8.2 षटकात 21 धावा दिल्या.