ICC ODI World Cup 2023 Australia vs Netherlands Match : विश्वचषक 2023 च्या 24 व्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नेदरलँड्सचा 309 धावांनी पराभव केला. यासह कांगारू संघाने विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय संपादन केला. विश्वचषकाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा आणि एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील दुसरा सर्वात मोठा विजय ठरला.
या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने प्रथम फलंदाजी करताना नेदरलँड संघाला 400 धावांचे लक्ष्य दिले, प्रत्युत्तरात नेदरलँड्सचा संघ अवघ्या 90 धावांवर सर्वबाद झाला. या सामन्यात नेदरलँडच्या एका स्टार खेळाडूने अतिशय खराब कामगिरी केली. त्यामुळे या खेळाडूच्या नावावर एक अत्यंत लाजिरवाणा(नकोसा) विक्रम नोंदवला गेला आहे.
नेदरलँड्सचा गोलंदाज बास डी लीडेने (Bas de Leede) ऑस्ट्रेलियाविरुद्ध अत्यंत खराब कामगिरी केली. या गोलंदाजानं 10 षटकात 115 धावा दिल्या. एकदिवसीय क्रिकेटमध्ये एका सामन्यात सर्वाधिक धावा देणारा तो सर्वांत महागडा गोलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या मिक लुईसच्या नावावर होता. 2006 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात त्याने 113 धावा दिल्या होत्या. आता 17 वर्षांनंतर त्याचा विक्रम मोडला आहे.
एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक धावा देणाऱ्या गोलंदाजांची यादी…
1. बास डी लीडे, 2023* : 115 धावा
2. मिक लुईस, 2006 : 113 धावा
3. एडम जांपा, 2023 : 113 धावा
4. वहाब रियाज, 2016 : 110 धावा
5. राशिद खान, 2019 : 110 धावा
बास डी लीडे याची कारकीर्द…
बास डी लीडे हा फक्त 23 वर्षांचा आहे आणि त्याने त्याच्या कारकिर्दीच्या अगदी सुरुवातीलाच त्याच्या नावावर एका नकोशा विक्रमाची नोंद झाली आहे. त्याने 2018 मध्ये नेदरलँड्सकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने नेदरलँड संघासाठी 35 एकदिवसीय सामन्यांमध्ये 33 विकेट घेतल्या आहेत. याशिवाय त्याने 31 टी-20 सामन्यात 27 विकेट घेतल्या आहेत.