#CWC2019 : नाणेफेक जिंकून न्यूझीलंडचा फलंदाजीचा निर्णय

लंडन : विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत पहिला उपांत्य सामनाभारत आणि न्यूझीलंड या संघामध्ये रंगणार आहे. साखळी फेरीत भारतानं किवींपेक्षा चांगली कामगिरी केली असून या सामन्यात भारताचं पारड जड आहे. आतापर्यंत विश्वचषकामध्ये दोन्ही संघांमध्ये 8 मुकाबले झाले असून भारतानं 3 तर न्यूझीलंडनं 4 सामने जिंकले आहेत. तर एक सामना अनिर्णित राहिला आहे.

क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारत-न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य सामन्यास काहीच वेळात सुरूवात होणार आहे. तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल हा न्यूझीलंड संघाच्या बाजूने लागला आहे. न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विल्यमसन याने प्रथम फलंदाजीचा निर्णय़ घेतला आहे.

दरम्यान, विश्वचषक स्पर्धेत सातत्याने भक्कम पाया रचणारी भारतीय संघाची फलंदाजाची पहिली फळी न्यूझीलंडच्या वेगवान व भेदक माऱ्यास कशी सामोरी जाते यावरच त्यांचे उपांत्य फेरीतील लढतीमधील यशापयश अवलंबून आहे. भारताच्या संमिश्र माऱ्यापुढे न्यूझीलंडचे फलंदाज किती टिकतात याचीच उत्सुकता आजच्या सामन्याबाबत निर्माण झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.