बिजापूर – छत्तीसगढमध्ये शुक्रवारी मतदानाची प्रक्रिया सुरू असताना ग्रेनेड स्फोटाची घटना घडली. त्या स्फोटात केंद्रीय राखीव पोलीस दलाचा (सीआरपीएफ) एक जवान शहीद झाला. नक्षलग्रस्त बस्तर लोकसभा मतदारसंघात मतदारांनी त्यांचा हक्क बजावला.
त्या मतदारसंघात येणाऱ्या बिजापूर जिल्ह्यातील एका गावात ग्रेनेडचा स्फोट झाला. निवडणुकीमुळे सुरक्षेच्या ड्युटीवर असणारे सीआरपीएफचे पथक गस्त घालत असताना अनावधानाने ग्रेनेड फुटला.
त्या स्फोटात सीआरपीएफचे कॉन्स्टेबल देवेंद्र कुमार जखमी झाले. त्यांना उपचारासाठी हेलिकॉप्टरने जगदलपूरला हलवण्यात आले. मात्र, उपचारावेळी त्यांची प्राणज्योत मालवली.
बिजापूर जिल्ह्यात दुसऱ्या ठिकाणी नक्षलवाद्यांनी पेरून ठेवलेल्या आयईडीचा स्फोट झाला. त्या घटनेत सीआरपीएफचा एक अधिकारी जखमी झाला.