T20 World Cup 2024 ( IND vs PAK ) : आयसीसीसी T20 विश्वचषक 2024 स्पर्धेला 1 जूनपासून सुरूवात होईल आणि या प्रतिष्ठित स्पर्धेचे आयोजन यावेळी वेस्ट इंडीज आणि युएसए (USA) संयुक्तपणे करणार आहेत. यावेळी एकूण 20 संघ यात सहभागी होणार असून या सर्व संघांची 4 गटात विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक गटात 5-5 संघांचा समावेश करण्यात आला आहे. भारताला ग्रुप वनमध्ये ठेवण्यात आले असून त्यात पाकिस्तान शिवाय आयर्लंड, कॅनडा आणि अमेरिका यांचा समावेश आहे.
या’ खेळाडूंना बनवले दोन्ही संघांचा चेहरा…
भारताला आपल्या गटात पाकिस्तानविरुद्ध खेळायचे असून दोन्ही देशांमधील हा सामना 9 जून रोजी होणार आहे. याआधी सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे जो आयसीसीने जारी केला आहे, असे सांगण्यात येत आहे. तथापि, आम्ही या पोस्टरच्या सत्यतेची पुष्टी करत नाही. या पोस्टरमध्ये शुभमन गिल आणि शाहीन आफ्रिदी हे दोन्ही संघांचे चेहरे दिसत आहेत. या पोस्टरमध्ये शुभमन गिल भारताचे प्रतिनिधित्व करताना दिसत आहे तर शाहीन आफ्रिदी पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करताना दिसत आहे.
मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे या पोस्टरवर भारतीय टी-20 संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि पाकिस्तान टी-20 संघाचा कर्णधार बाबर आझम यांना दाखवण्यात आलेले नाही. यापूर्वी आयसीसीच्या पोस्टर्समध्ये विराट कोहली किंवा रोहित शर्मा यांची छायाचित्रे छापण्यात आली होती. पण व्हायरल होत असलेल्या पोस्टरमध्ये या दोन खेळाडूंचे कोणतेही छायाचित्र नाही. शुभमन गिल हा भारताचा स्टार युवा फलंदाज आहे आणि शाहीन आफ्रिदी हा पाकिस्तानच्या T20 संघाचा माजी कर्णधार आहे, पण आपापल्या संघासाठी या दोघांपेक्षा मोठे चेहरे म्हणजे रोहित शर्मा-विराट कोहली आणि बाबर आझम हे आहेत.
भारत-पाकिस्तान सामन्याची क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत यात शंका नाही. दोन्ही देश आपापसात द्विपक्षीय मालिका खेळत नाहीत, पण दोघेही आयसीसी स्पर्धांमध्ये एकमेकांविरुद्ध खेळताना दिसतात.
भारताचे गट-स्टेज वेळापत्रक
भारत विरुद्ध आयर्लंड – 5 जून (न्यूयॉर्क)
भारत विरुद्ध पाकिस्तान – 9 जून (न्यूयॉर्क)
भारत विरुद्ध यूएसए – 12 जून (न्यूयॉर्क)
भारत विरुद्ध कॅनडा – 15 जून (लॉडरहिल)
T20 विश्वचषक 2024 मध्ये सहभागी होणारे संघ…
अ गट : भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा आणि अमेरिका.
ब गट : इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड आणि ओमान.
क गट : न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, युगांडा आणि पापुआ न्यू गिनी.
ड गट : दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड आणि नेपाळ.